दसनूरच्या उमेश्वर माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा 26 वर्षानंतर स्नेहमेळावा


Reunion of former students of Umeshwar Secondary School, Dasanur after 26 years सिंगनूर, ता.रावेर : येथून जवळच असलेल्या दसनूर येथील उमेश्वर माध्यमिक विद्यालयात 1997-98 मध्ये शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी तब्बल 26 वर्षानंतर स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आले. यावेळी माजी विद्यार्थी शाळेय आठवणीत रमले. प्रत्येक जण आपली शाळा कशी आहे हे डोळ्यामध्ये साठवून घेत होता तर जुने वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्‍यावर दिसून आला.

पर्यावरणाची जोपासना करा : आर.एच.पाटील
स्नेह मेळाव्यात प्रत्येक विद्यार्थ्यानी आपला परिचय दिला. आपण कोठे राहतो, काय नोकरी करतो? काय व्यवसाय करतो? याची संपूर्ण माहिती यावेळी देण्यातय आली. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक आर.एच.पाटील होते.माजी त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून लांब रहावे, पर्यावरणाची जोपासना करावी तसेच जुन्या आठवणींना उजाळा देणे एक वेगळा आनंद असल्याचे सांगितले.
माजी मुख्याध्यापक पी.टी.महाजन बी.के.पाटील, पी.डी पाटील, निवृत्त शिक्षक एस.एस बारूदवाले, बी.जे.तायडे, आर.एस.पवार, मुख्याध्यापक एस.जी.महाजन, उपमुख्याध्यापक आर.एल.तायडे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिपाई, क्लार्क, कर्मचारी या स्नेह मेळाव्यास उपस्थित होते. यावेळी आजी-माजी शिक्षकाचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ.अतुल पाटील यांनी केले तर आभार गोविंदा कोळी यांनी मानले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !