वादळी वार्‍याने केळीचे नुकसान : खासदारांनी केली पाहणी


Damage to bananas due to stormy winds : MPs inspected मुक्ताईनगर : बोदवडसह मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वार्‍यामुळे केळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने खासदार रक्षा खडसे यांनी नुकसानीची पाहणी केली.

पंचनामे रण्याच्या सूचना
रविवार, 26 मे रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली व पातोंडी या शेती शिवारात स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्यासह खासदार रक्षा खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. संबंधितांकडून तत्काळ पंचनामे करून घेण्याच्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सूचना केल्या. 20 मे रोजी मौजे बेलसवाडी (मुक्ताईनगर) येथे गुरांच्या गोठ्याला आग लागल्यानंतर तेथेदेखील खासदार रक्षा खडसे यांनी भेट देत पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करणार असल्याबाबत आश्वासन त्यांनी दिले.


बोदवड तालुक्यातही पाहणी
पाऊस वादळी वार्‍यामुळे नुकसान झालेल्या बोदवड तालुक्यातील गावांमध्ये खासदार रक्षा खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. रविवार, 26 मे रोजी बोदवड तालुक्यातील विविध गावात वादळी वार्‍यासह पाऊस झाल्याने झालेल्या नुकसानीचीही खासदार रक्षा खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. संबंधितांकडून तत्काळ पंचनामे करून घेण्याच्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सूचना केल्या. वकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे बोदवड तालुक्यात पिकांसह महावितरणच्या पोल, तार व रोहित्राचे मोठे नुकसान झाल्याने त्यांच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे खासदार म्हणाल्या. नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !