रावेर लोकसभेच्या चुरशीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार ?

वंचित आघाडीच्या मतांवर ठरणार विजयाचे गणित : सट्टा बाजाराचा खासदार रक्षा खडसेंना कौल


भुसवळ : रावेर लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून या निवडणुकीत कोण विजयी होणार हे मंगळवारी दुपारी वाजेच्या आत कळणार आहे. भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गटाने विजयाचे दावे केले असलेतरी सट्टा बाजाराचा कौल मात्र खासदार रक्षा खडसेंकडे आहे. यंदा लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला असून प्रथमच मुस्लिम मतदान स्वयंस्फूर्तीने बाहेर निघाले तर वंचित आघाडी या निवडणुकीत किती मते घेणार? यावर देखील विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.

जातीय समीकरणे महत्त्वाची ठरणार
रावेर लोकसभा मतदार संघात वंचित आघाडीला मिळालेली मते, नवमतदार, दलित- मुस्लिम मतांचा कौल, मराठा मतदारांची भूमिका आदींवर निवडणुकीत विजयाचे गणित अवलंबून आहे. देशाची निवडणूक असल्याने या निवडणुकीत जातीय समीकरणे कितपत यशस्वी ठरतात, हे पाहणेही औत्सुक्याचे आहे.


सट्टा बाजार : तेजीत, पैजा लागल्या
मराठा व मुस्लिम मतदानामुळे तसेच मतदारांचा उत्साह पाहता कौल आम्हालाच मिळेल, असा दावा राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी केला आहे तर एक ते दीड लाख मताधिक्याने विजयी होऊ असा दावा भाजपच्या रक्षा खडसेंनी केला आहे. दरम्यान, चुरशीच्या निवडणुकीत सट्टा बाजारातही तेजी आली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !