बोदवड शहरात अॅड.रोहिणी खडसे यांच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा
Water supply through tanker through Adv.Rohini Khadse in Bodwad city बोदवड : सध्या बोदवड शहरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. जनावरांचे सुद्धा पाण्याअभावी हाल होत असून नागरिकांना विकत घेण्याची वेळ आली आहे. 20 ते 22 दिवस उलटल्यानंतर नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांमध्ये सत्ताधार्यांविषय रोष आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे यांच्या माध्यमातून शहरवासीयांना 40 टँकर पाणी उपलब्ध करून दिले आहे.
नवीन पाणीपुरवठा योजना सुरू होणार कधी ?
आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीपूर्वी जुनोने धरणावरून तात्पुरती पाणीपुरवठा योजना करण्याची आणि त्यासाठी निधी मंजूर झाल्याची घोषणा केली होती परंतु ती हवेत विरली. त्यानंतर त्यांनी नवीन पाणीपुरवठा योजने संदर्भात दरवर्षी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सोबत बैठका घेऊन घोषणा केल्यात परंतु नेहमीची येतो पावसाळा या उक्ती प्रमाणे दरवर्षी घोषणा करून सुद्धा अद्यापही नवीन पाणी पुरवठा योजनेवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

टँकरने मिळाला नागरिकांना दिलासा
बोदवड शहरात आणि तालुक्यात असलेली तीव्र पाणीटंचाई बघता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना बोदवड शहर आणि तालुक्यासाठी पाणीटंचाईवर टँकर व इतर उपाययोजना करण्यासंबंधी निवेदन देऊन मागणी केली होती परंतु प्रशासनातर्फे अद्यापही टँकर किंवा इतर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने व नागरिकांचे हाल रोखण्यासाठी रोहिणी खडसे यांनी त्यांच्या सौजन्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बोदवड शहरातील विविध प्रभागात 40 टँकरद्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक बोदवड शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहेत यातून नागरिकांना काही अंशी तरी दिलासा मिळाला आहे. बोदवड शहरातील नागरिकांनी टँकरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक यांच्या सोबत संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केले आहे.




