भुसावळ विभागाने ‘मे’ महिन्यात मध्ये मिळवला 137 कोटींचा महसूल


भुसावळ : भुसावळ रेल्वे विभागाने प्रवासी सेवा व माल वाहतूक तसेच अन्य सेवांच्या माध्यमातून तब्बल 137 कोटींचा महसूल मिळवत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भुसावळच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ईती पांडे यांच्या नेतृत्वाखाली वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या एकत्रीत प्रयत्नांमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे.

माल वाहतुकीतून 49.32 कोटींचा महसूल
प्रवासी वाहतुकीतून रेल्वे विभागाने मे 2024 महिन्यात 75.94 कोटी रुपयांचा महसूल मिळवला तर तिकीट तपासणीच्या माध्यमातून 96 हजार केसेसद्वारे 7.82 कोटी रुपयांच्या महसूल प्राप्त झाला आहे. विविध कोचिंगमधून मिळणार्‍या महसुलातही लक्षणीय वाढ झाली असून ती 6.06 कोटींवर पोहोचली आहे. विविध सेवा देण्याच्या विभागाच्या वचनबद्धतेमुळे माल वाहतुकीद्वारे 49.32 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मालगाड्यांनी मोटारगाड्या, पेट्रोलियम उत्पादने, कांदे, अन्नधान्य आणि सिमेंट वॅगनसह विविध प्रकारच्या मालाची वाहतूक केली आहे. पार्सल सेवेने एकूण 3.26 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. या व्यतिरिक्त इतर व्यावसायीक माध्यमातून 2.70 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !