बारामतीत प्रतिष्ठेची लढाई : सुप्रीया सुळे यांना 21 हजार मतांची आघाडी


बारामती : राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामतीमध्ये पुतण्या अजितदादांना शरद पवारांनी चांगलीच मात दिली आहे. लोकसभेच्या निकालाची मतमोजणी सुरू झाली असून दुसर्‍या फेरीनंतर शरद पवारांच्या लेक सुप्रिया सुळे या 21 हजार मतांनी आघाडीवर आहेत. सकाळपासून सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात अटीतटीचा सामना सुरू आहे. कधी सुप्रिया सुळे तर कधी सुनेत्रा पवार आघाडीवर आल्याचे पाहायला मिळतंय. पाचव्या फेरीनंतर सुप्रिया सुळे तब्बल 21 हजारांनी पुढे आहेत. सातत्याने सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत.

अजित पवार गटाचे खाते उघडले नाही
अजित पवार गटाला महाराष्ट्रात एकही खाते उघडता आलेले नाही. बारामतीमध्ये दोन्ही गटाकडून पूर्ण ताकद लावण्यात आली होती. मात्र बारामतीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. पत्नी सुनेत्रा पवारच रिंगणात असल्याने अजित पवारांनी अगदी सोसायटीपर्यंत जाऊन प्रचार केला होता. मात्र, अजित पवारांना बारामतीकरांनी साथ न देता शरद पवारांना साथ दिल्याचे चित्र पहिल्या फेरीत दिसले आहे.


बारामती लोकसभेसाठी यंदा काका-पुतण्यांनी संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावत एकमेकांना आव्हान दिले आहे. गेल्या अनेक वर्षांतील राजकीय अनुभवाचे काका-पुतण्यांचे कसब यावेळी संपूर्ण बारामती मतदारसंघाने अनुभवले. ज्येष्ठ नेते शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच मुलीसाठी मैदानात उतरले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पत्नीसाठी राजकीय कारकीर्द पणाला लावल्याचे चित्र आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !