जळगाव जिल्ह्यात भाजपाचा डंका : जळगाव लोकसभेत स्मिता वाघ तर रावेरात रक्षा खडसे विजयी


जळगाव : जळगावसह रावेर लोकसभेसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीनंतर मंगळवार, 4 जून रोजी सकाळी मतमोजणी सुरू आहे. दोन्ही जागांवर सुरूवातीपासून भाजपाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. जळगाव मतदारसंघाची मतमोजणी पूर्णत्वाकडे आली असून त्यानुसार भाजपाच्या स्मिता वाघ या विजयी झाल्या आहेत तर रावेरमध्ये विद्यमान खासदार रक्षा खडसे या विजयी झाल्या असून त्यांनी महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांचा दारुण पराभव केला आहे.

भाजपा कार्यालयाबाहेर जल्लोष
जळगावसह रावेरात मिळालेल्या यशानंतर जळगावातील जी.एम.फाउंडेशनच्या कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात बेभान होवून नृत्याला सुरूवात केली आहे. दोन्ही जागांवर यशाचे शिलेदार हे मंत्री गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण ठरले आहेत.


 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !