शिरपूर-शहादा सीमेवर प्राध्यापकावर गोळीबार


शहादा  : शिरपूर तालुक्यातील प्राध्यापकावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. ही घटना अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावर तालुक्यातील तर्‍हाडीजवळ रविवार, 9 जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेत प्राध्यापक गंभीर जखमी असून त्यांच्यावर शिरपूर शहरातील इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

गोळीबाराचे कारण गुलदस्त्यात
दिनेश रमेश पटेल असे जखमी प्राध्यापकांचे नाव आहे. ते शिरपूर शहरातील एसपीडीएम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. ते 9 जून रोजी दुचाकीने शिरपूर येथे येताना तर्‍हाडी जवळ मागून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञाताने गोळीबार करून पसार झाले. त्यात एक गोळी कमरेजवळ लागल्याने ते जखमी झाले. त्या अवस्थेत तर्‍हाडीपर्यंत दुचाकी नेत ग्रामस्थांना घडलेली हकिगत सांगितल्याने ग्रामस्थांनी शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.






घटनेची माहिती मिळताच नंदुरबारचे पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, सारंगखेडा प्रभारी पोलिस निरीक्षक गणेश वारुळे, पोलिस उपनिरीक्षक किरण बारे, ठाणे अंमलदार, ठाणसिंग राजपूत, चुनीलाल ठाकरे आदींनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !