यावल तालुक्यातील केळी उत्पादकांवर अन्याय

डॉ.कुंदन फेगडे यांचे प्राताधिकारी कार्यालयात निवेदन


यावल : फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात आश्रय फाउंडेशन व शेतकर्‍यांनी निवेदन दिले. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सर्वत्र उष्णतेची लाट होती व तशी नोंददेखील इतर तालुक्यात झाली मात्र यावलला तापमान कमी दाखवत केळी उत्पादक शेतकर्‍यांना फळ पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन
यावल तालुक्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांसह आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी सोमवारी प्रांताधिकारी कार्यालय, फैजपूर येथे निवेदन दिले. निवेदनाचा आशय असा की, जळगाव जिल्ह्यात सर्वत्र उष्णतेची लाट होती व तशा नोंदी सर्व तालुक्यात झाल्या मात्र यावलला कमी तापमान दाखवून तालुक्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांवर अन्याय झाला आहे. मे महिन्यामध्ये सलग पाच दिवस 45 अंशापेक्षा अधिक तापमान जळगाव जिल्ह्यात होते. त्याचा फटका केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या पिकाला बसला होता. जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकूण 51 महसूल मंडळ समाविष्ट झाले आहेत. यावल तालुक्यातील एकही महसूल मंडळाचा समावेश नाही. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तापमान 45 अंशापेक्षा जास्त असताना फक्त यावल तालुक्यात कमी तापमान कसे, हवामान केंद्रातील कर्मचारी कामात कुचराई करत असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले, यास जबाबदार कोण ? या प्रकरणाची गंभीर दाखल घ्यावी आणि शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शेतकर्‍यांवर झालेला अन्याय जर दूर झाला नाही तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !