खासदार रक्षा खडसेंचा पाठपुरावा : वादळी वार्‍यासह गारपीटीने शेतकर्‍यांचे नुकसान ; 130 कोटींची भरपाई खात्यात वर्ग


मुक्ताईनगर : पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2023-2024 अंतर्गत वादळी वारे व गारपीटीने जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांचे नुकसान झाले होते.

केळी उत्पादकांना भरपाईची प्रतीक्षा लागून असताना जळगाव जिल्ह्यातील 35 हजार 803 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 130 कोटींची भरपाई वर्ग करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे. शेतकर्‍यांना भरपाई म्ळिण्यासाठी रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पाठपुरावा केला होता.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !