भुसावळात नेवे वाणी समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात 284 युवक-युवतींनी दिला परिचय

लोणारी हॉलमध्ये राज्यभरातील समाजबांधवांची उपस्थिती


भुसावळ : शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात नेवेवाणी समाज विकास प्रतिष्ठान कल्याण, मुंबई परिसर आयोजित नेवेवाणी समाजातर्फे अखिल भारतीय वधू-वर व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात राज्यभरातील 280 वधू-वरांनी परिचय दिला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सुनील नेवे होते. नेवे-वाणी समाज विकास प्रतिष्ठान कल्याण- मुंबई परीसर आयोजित नेवे वाणी समाजातर्फे अखिल भारतीय वधू-वर व पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वधू-वर परिचय मेळाव्यात पुणे, मुंबई, नाशिक, अहमदाबाद, बर्‍हाणपूर, इंदूर, जळगांव, धुळे, चोपडा, यावल, साकळीसह विविध राज्यातून समाजबांधव उपस्थित होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.सुनील मधुकर नेवे, तुषार नेवे, आनंद नेवे पुणे, प्रदीप लोहारीकर (अहमदाबाद) यांच्यासह समाजातील विविध मंडळाचे अध्यक्ष, नेवे वाणी विकास प्रतिष्ठान कल्याण मुंबईचे अध्यक्ष सुनील पद्माकर नेवे, उपाध्यक्षा स्मिता श्रीकांत नेवे आदी उपस्थित होते, सकाळी 11 वाजता स्वागत समारंभ व मेळाव्याचे उद्घाटन सकाळच्या सत्रात 100 वर-वधूंनी परिचय करून दिला तर दुपारूनही परिचय करून देण्यात आला. यावेळी 284 वधू-वरांच्या नावांची नोंदणी झाली होती. सकाळी 11 ते 1.30 पर्यंत व्यासपीठावरून उपवर वर-वधू यांनी संवाद साधला व आपला परीचय करून दिला. सूत्रसंचलन रमेश रघुनाथ नेवे-वाणी कल्याण यांनी केले.


योग्य वेळी विवाह काळाजी गरज
ज्येष्ठ मार्गदर्शक दादा नेवे (यावल) म्हणाले की, आज समाजात मुला-मुलींचे वय वाढत आहे मात्र योग्य जोडीदार मिळत नसल्याने वधू-वरांच्या आई-वडीलांची काळजी वाढत आहे. मुले-मुली करीअर मागे धावत आहेत, योग्यवेळी विवाह होणे ही काळाची गरज आहे. पूर्वीच्या काळी अशी परीस्थिती नव्हत, मात्र नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने देशभरात विविध ठिकाणी समाजबांधव आहेत. यावेळी अध्यक्ष सुनील नेवे यांनी सांगितले की, आज समाजबांधव विविध शहरात विखुरलेले आहे, त्यांच्या मुला-मुलींना विवाह करण्यास अडचण येते, धावत्या युगात एकमेकांशी संपर्क कमी असल्याने योग्य जोडीदाराचे शोध मोहिमेत पालकांना सोपे जावे, या संकल्पनेतून आम्ही भुसावळ येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आजच्या कार्यक्रमात एकूण 284 वर-वधूंची नाव नोंदणी झाली आहे. या 284 नावांमधून कुणाचेही लग्न जमल्यास मंडळातर्फे त्या नवदाम्पत्यास 11 हजारांची संसारपयोगी वस्तूंचे गिफ्ट नेवे-वाणी विकास प्रतिष्ठान कल्याण- मुंबई परीसर यांच्यातर्फे दिले जाईल, असे जाहीर करण्यात आले.

भविष्यातही मेळावे घेणार
राज्यासह शेजारच्या राज्यातून सुध्दा समाजबांधव मोठ्या संख्येने वधू-वर परिचय मेळाव्याला उपस्थित राहिल्याने समाजबांधवांच्या गाठी-भेटी झाल्याने त्यांच्यामधून आनंद व्यक्त करण्यात आला. मेळाव्याला लाभलेला प्रतिसाद पाहून आयोजकांनी सुध्दा समाधान व्यक्त केले. भविष्यात सुध्दा असे मेळाव्यांचे आयोजन केले जाईल, असे अध्यक्ष सुनील पदमाकर नेवे यांनी सांगितले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !