नवापूर तालुक्यात जावयाचा खून : सासू-माम सासर्‍यासह पाच अटकेत


नवापूर : पत्नीसह सासूला जीवे ठार मारण्याची धमकी देणार्‍या जावयाचा सासूसह माम-सासर्‍यानेच काटा काढला मात्र या खुनाची उकल करण्यात यंत्रणेला यश आले. याप्रकरणी पाच संशयीतांना अटक करण्यात आली. राकेश रमेश समाल (29, रा.विष्णूनगर 2, बामरोली रोड, उधना, सुरत गुजरात) असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे.

असे आहे प्रकरण
नवापूर तालुक्यातील झरीपाडा गावाच्या फाट्याजवळ रस्त्यावरील नाल्याच्या फरशी पुलाच्या पाईपमध्ये एका गोणीत युवकाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांच्या तपासात पत्नी व सासूला त्रास देत असल्याच्या कारणावरुन सासू व मामसासर्‍यानेच डोक्यात दगड टाकत जावयाचा खून करून मित्रांच्या सहाय्याने केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संशयित सासू, मामसासर्‍यासह पाच संशयितांना अटक करण्यात आली. मयत व्यक्तीच्या पॅन्टच्या खिशात आधार कार्ड मिळाल्यानंतर त्याची ओळख पटताच खुनाची उकल करण्यात यश आले.

धमकी मिळत असल्याने काढला काटा
मृत युवक राकेश रमेश समाल याची सासरवाडी नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा (खांडबारा) येथील आहे. मृताच्या सासरवाडीत सासू अनिता अनिल शिंदे आणि त्याचे मामसासरे अमर हरी पवार आणि इतर नातेवाईक यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता अमर पवार हे पोलिसांना उडवा-उडवीचे उत्तर देत असल्याने अधिक चौकशी केली असता मृत युवक राकेश समाल हा त्याची पत्नी व सासू यांना नेहमी जीवेठार मारण्याच्या धमक्या देत होता. पत्नी व सासूशी नेहमी वाद घालत होता व वारंवार त्रास देत असल्यामुळे सासू आणि मामसासरे यांनी वेळोवेळी समजावून देखील राकेश ऐकत नसल्याने सासू अनिता शिंदे हने जावई राकेश समाल यास कोणत्यातरी बहाण्याने नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा खांडबारा येथे आणत त्याचा अन्य संशयीताच्या मदतीने काटा काढला.


कॉपी करू नका.