धुळ्यात धूम स्टाईल चैन स्नॅचिंग : आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Dhuleat Dhoom Style Chain Snatching : Accused in Local Crime Branch’s net धुळे : रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन धूम स्टाईल आलेल्या चोरट्याने लांबवली होती. ही घटना बुधवार, 12 रोजी सायंकाळी सहा वाजता शिवप्रताप कॉलनी, नकाणे रोडवर घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात आरोपी निष्पन्न करून त्यास बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. दादाभाऊ हिरामण पाटील (28 मूळ रा.गोताणे, जि.धुळे, ह.मु.वंजार गल्ली, दत्त मंदिराजवळ, सुभाष नगर, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
37 ग्रॅम वजनाची मंगलपोत जप्त
हेमलता निर्मलकुमार चौधरी (48, शिवप्रताप कॉलनी, धुळे) ही महिला बुधवारी सायंकाळी सात वाजता पायी जात असताना भामट्याने धूम स्टाईल येत पोत लांबवली होती. पश्चिम देवपूर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने पांझरा नदीपात्रातून आरोपी दादाभाऊ पाटील याच्या मुसक्या बांधल्या. आरोपीकडून 37 ग्रॅम वजनाची व दोन लाख 23 हजार रुपये किंमतीची मंगलपोत जप्त करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, योगेश राऊत, अमरजीत मोरे, संजय पाटील, दिलीप खोंडे, शाम निकम, धनंजय मोरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, रवीकिरण राठोड, पंकज खैरमोडे, योगेश चव्हाण, संदीप सरग, प्रकाश सोनार, तुषार सूर्यवंशी, शशीकांत देवरे, महेंद्र सपकाळे, सुशील शेंडे, जितेंद्र वाघ, हर्षल चौधरी, अमोल जाधव सुनील पाटील आदींच्या पथकाने केली.