प्रत्येक तलाठ्याने मुख्यालयात थांबावे : तहसीलदार मोहनमाला नाझीरकर
यावल तहसील कार्यालयात मंडळाधिकारी, तलाठ्यांची बैठक
यावल : सध्या शाळा प्रवेशाची लगबग सुरू झाली असून याकरीता विद्यार्थ्यांना विविध दाखले आवश्यक असल्याने प्रत्येक तलाठ्याने दररोज आपापल्या मुख्यालयी तथा कार्यालयात थांबावे. अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीचे अनुदान शेतकर्यांची ई केवायसी नसल्याने रखडल्याने तलाठ्यांनी पुढाकार घेत शेतकर्यांची ईकेवायसी करून घ्यावी, अशा सुचना यावल तहसीसलदार मोहनमाला नाझीरकर यांनी केल्या. मंगळवारी तहसील कार्यालयात मंडळाधिकारी, तलाठ्यांची बैठक मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
यांची होती उपस्थिती
यावल तहसील कार्यालयात मंगळवारी तहसीसलदार मोहनमाला नाझीरकर यांनी मंडळाधिकारी, तलाठी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी शैक्षणिक वर्षाला सुरवात तसेच शेतकर्यांच्या खरीप हंगामाला देखील सुरवात होत असल्याने ग्रामीण भागात तलाठी कार्यालयाच्या कामकाजा संदर्भात सूचना केल्या. नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीत शेतकर्यांचे नुकसान झाले असून शेतकर्यांना अनुदानदेखील मंजूर झाले. त्याचे वितरण शासन स्तरावरुन ऑनलाईन पध्दतीनेे करण्यात आले मात्र यात यावल तालुक्यातील 45 गावातील 240 शेतकर्यांची बँकेत ई-केवायसी नसल्याने अनुदान परत गेले व शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याने या सर्व शेतकर्यापर्यंत तलाठी वर्गाने जावुन ई-केवायसी करून घ्यावी, अशा सुचना या बैठकीत तहसीलदारांनी केल्या. यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, सुयोग पाटील, मंडळाधिकारी सचिन जगताप, मंडळाधिकारी मीना तडवी, मंडळाधिकारी बबीता चौधरी, मंडळाधिकारी एम.एच.तडवी, मंडळ अधिकारी एस.एल.पाटील, मंडळाधिकारी अतुल बडगुजर, मंडळाधिकारी मिलिंद देवरेसह सर्व तलाठी उपस्थित होते.

अशा केल्या सुचना
प्रत्येक तलाठ्याने कार्यालयात थांबावे, शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विविध दाखल्याकरीता विद्यार्थी व नागरीक तलाठी कार्यालयात येतात तेव्हा प्रत्येक तलाठ्याने आपापल्या कार्यालयात दररोज थांबावे, प्रभारी पदभार असल्यास आपण कोणत्या दिवशी कोणत्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहाल यावी ठळक माहिती कार्यालयात लिहून नागरीकांना कळवावे, ऑनलाईनची कामे, ई-चावडीच्या माध्यमातुन वसुली संदर्भात खातेदारांना नोटीस बजवण्यात यावी, तसेच ई पीक पाहणी अॅप्सच्या माध्यमातून आगामी काळात प्रत्येक शेतीक्षेत्राची नोंद अपडेट ठेवावी, ऑनलाईनचे काम दररोज पूर्ण कराव., शेतीक्षेत्रावर ठेवावे लक्ष, पावसाचे वातावरण व प्रसंगी कुठे अतिवृष्टी झाल्यास तलाठी वर्गाने त्यांची माहिती तातळीने प्रशासनास द्यावी, आपत्तीजनक परीरस्थिती उध्दभवल्यास त्यावर उपाय योजनेकरीता तलाठी वर्गाने दक्ष रहावे, अशा सुचना प्रसंगी करण्यात आल्या.




