वही तुला करताना मंत्री प्रतापराव जाधव पडले
Minister Prataprao Jadhav fell while reading the book मुंबई : मोदींच्या मंत्रिमंडळात चार वेळा खासदार म्हणून बाजी मारणारे शिवसेनेचे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच राज्यमंत्री पद मिळाले असून मतदारसंघात विविध संघटना आणि व्यक्तींकडून त्यांचे जाहीर सत्कार केले जात आहेत मात्रअशाच एका कार्यक्रमात वहीतुला करताना प्रतापराव जाधव यांच्या तराजूच्या पारड्याची साखळी तुटली आणि ते खाली पडले. यासंबंधीचा एक सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे.
साखळी तुटताच गेला तोल
केंद्रात मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये प्रतापराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांची वहीतुला आयोजित केली होती. यादरम्यान मोठ्या तराजूच्या एका पारड्यात वह्यांची रास ठेवण्यात आली होती तर दुसर्या पारड्यात प्रतापराव जाधव स्वत: बसले मात्र यावेळी प्रतापराव जाधव पारड्यात बसताना अचानक पारड्याची साखळी तुटली. त्यामुळे प्रतापराव जाधव यांचा तोल गेला आणि पारड्यातून खाली पडले.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना सावरण्याच प्रयत्न केला. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेची सर्वत्र चर्चा सुरु झाली.




