मुक्ताईनगरात क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसेंवर जेसीबीतून फुलांची उधळण


JCB showered flowers on Minister of State for Sports Raksha Khadse in Muktainagar मुक्ताईनगर : केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे यांचे शनिवार, 15 जून रोजी सकाळी आगमन झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मंत्री रक्षा खडसेंवर जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, नंदू महाजन, जयपाल बोदडे, ललित महाजन, प्रफुल जवरे, तुषार राणे, पंकज भारंबे, विनायक पाटील, गणेश कोळी, अंकुश चौधरी, सचिन पाटील, सतीश चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर रीघ
मंत्री खडसे यांचे कारने मुक्ताईनगरात आगमन झाल्यानंतर बोदवड चौफुली येथून जयघोष करत त्यांचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करीत मिरवणूक काढण्यात आली. परिवर्तन चौकात महापुरुषांना त्यांनी वंदन केले तसेच सासरे आमदार एकनाथराव खडसे यांचा आशीर्वाद घेत त्या पती स्व.निखील खडसे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाल्या. यावेळी त्यांना गहिवरून आले. दिवसभर रावेर मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली होती.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !