चुलतभावाने व्हिडीओ काढून मित्रांसह केला विवाहित बहिणीवर अत्याचार : एमआयडीसी पोलिसात त्रिकूटाविरोधात गुन्हा


Cousin took video and raped married sister with friends : MIDC police case against trio जळगाव : लग्नाच्या ठिकाणी कपडे बदलणार्‍या चुलतबहिणीचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत चुलतभावासह त्याच्या दोन मित्रांनी विवाहित बहिणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. 4 डिसेंबर 2022 ते 6 जून 2024 दरम्यान हा प्रकार पीडीतेच्या, जंगलात व धुळे जिल्ह्यात घडला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कपडे बदलताना काढले फोटो
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 27 वर्षीय महिला काकाच्या मुलीच्या लग्नासाठी दोंडाईचा, जि.धुळे येथे गेल्यानंतर लग्नाच्या ठिकाणी गेल्यानंतर कपडे बदलत असताना तिच्या चुलतभावाने तिचे फोटो काढण्यासह व्हिडिओदेखील तयार केला. त्यानंतर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेच्या घरी चुलतभावाने अत्याचार केला.

त्यानंतर पुन्हा तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावत अत्याचार सुरूच ठेवला. त्याने अन्य दोन मित्रांनादेखील सोबत आणले व तिघांनी वेळोवेळी महिलेवर अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रविवारी चुलत भाऊ तसेच त्याचे दोन मित्र अशा एकूण तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहेत.


कॉपी करू नका.