माळी समाजाचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवा : माळी हक्क परिषदेत ठराव
भुसावळ : महाराष्ट्रात माळी समाजाचे प्रमाण अधिक असून माळी समाजाचे जास्तीत-जास्त प्रतिनिधी विधानसभेत पाठवावे, असा ठराव भुसावळात झालेल्या माळी हक्क परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी अविनाश ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जामोदचे माजी आमदार कृष्णकांत इंगळे, उत्तमराव महाजन, विजय महाजन, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, पद्माकर महाजन, गुरुनुले, वंदना तिखे आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी समाजाच्या उमेदवारासाठी प्रयत्न करणार
याप्रसंगी मान्यवरांनी सांगितले की, ज्या राजकिय पक्षाने माळी समाजाचे उमेदवार दिले त्या पक्षाच्या पाठीशी माळी समाज उभा राहणार आहे तसेच त्या व्यक्तीस निवडून आणण्याचे कार्य आहे माळी समाज हक्क परिषद करणार आहे. आम्ही सर्व पक्षाकडे माळी समाजाचा उमेदवार देण्यासाठी मागणी करणार आहोत. सूत्रसंचालन प्रा.कांडेलकर यांनी तर आभार गजेंद्र महाजन यांनी मानले. या कार्यक्रमात महाराष्ट्र भरातून माळी समाजाचे दोनशे प्रतिनिधी उपस्थित होते. आयोजक कैलास महाजन, संतोष इंगळे व राजेंद्र महाजन होते. यशस्वीतेसाठी माळी समाज हक्क परिषदेचे संतोष माळी, सुभाष महाजन, सारंगधर माळी, पवन माळी, धनंजय महाजन आदींनी परिश्रम घेतले.





