भुसावळातील मुस्लिम नुमाईदा फाउंडेशनकार्य कौतुकास्पद : मुख्याधिकारी महेश वाघमोडे


भुसावळ : शहरातील मुस्लिम नुमांईदा फाउंडेशनद्वारा खडका रोड भागातील रॉयल पार्क भागातील निर्माण होणार्‍या मल्टिनॅशनल हॉस्पिटल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली. भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी मुस्लिम नुमांईदा फाउंडेशनतर्फे शहरातील गरीब लोकांसाठी मोफत मल्टिनॅशनल हॉस्पिटल निर्माण केले जात असून त्यांच्याकडून भुसावळ शहरासाठी वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने या कार्याचे कौतुक केले. फाउंडेशनचे पालक सलीमशेठ चुडीवाले यांनी जागा व 50 लाख रुपये व इतरांनी विविध स्वरूपात डोनेशन देऊन वृक्षारोपणासह मोफत हॉस्पिटलची निर्मिती करण्याचे काम अनुकरणीय व कौतुकास्पद असल्याचे मुख्याधिकारी म्हणाले.

प्रत्येकाने एक तरी झाड लावावे
भुसावळ नगरपरिषदेचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना पाटील यांनी शहरासाठी प्रत्येकाने एकतरी झाड लावून त्याचे संगोपन, संवर्धन करावे जेणे करून भविष्यात भुसावळ उष्णतामान कमी होईल, असे आवाहन यावेळी केले. मुस्लिम इमानदार फाउंडेशनचे सलीम शेठ चुडीवाले यांनी वृक्ष लागवड होणे आज काळाची गरज असल्याचे सांगत वृक्ष लागवडीचे आवाहन केले. यावेळी दवाखाना व रॉयल पार्क परीसरात मुख्याधिकारी महेश वाघमोडे, व पर्यावरण जागरचे नाना पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


यांची होती उपस्थिती
यावेळी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी शेख परवेज अहमद, लोकेश ढाके, नगर अभियंता नंदकिशोर येवतकर, वैभव पवार तसेच मुस्लिम नुमाईंदा फाऊंडेशनचे पालक सलीमसेठ चुडीवाले, अध्यक्ष फरहान खान, साबीर भाई मणियार, शेख शोएब, अकील खान, हाजी फारूक देशमुख, शेख सलमान यांच्यासह मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !