बर्‍हाणपूर राष्ट्रीय महामार्गाचे मूळ मार्गानेच व्हावे चौपदरीकरण

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरींकडे मागणी


Barhanpur National Highway should be made four-lane in the original way मुक्ताईनगर  : बर्‍हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण हे आधीच्या मूळ मार्गानेच करावे, अशी मागणी करीत त्याबाबत आदेश पारीत करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

ठेकेदाराला आदेश देण्याची मागणी
राष्ट्रीय महामार्ग बर्‍हाणपूर-अंकलेश्वर रस्त्याचे चौपदरीकरण हे मुक्ताईनगर तालुक्यातून न करता आधीच्या मूळ मार्गानेच रावेर व सावदा येथून करावे तसेच या रस्त्याची सध्या सुरू असलेली देखभाल दुरुस्ती तत्काळ सुरू करण्याबाबत ठेकेदाराला आदेश द्यावेत, अशी मागणी मंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिल्ली भेटीत केली.


निधी मंजूर मात्र काम संथगतीने
महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी 61 कोटींचा निधी मंजूर असून ठेकेदारामार्फत दुरुस्तीचे काम सध्या बंद करण्यात आले आहे. या संदर्भातील तक्रारी आल्यानंतर राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी मंत्री गडकरी यांची भेट घेत रस्त्याची देखभाल दुरुस्ती असलेल्या ठेकेदारास काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना कराव्यात अथवा कंत्राटदार बदलावा, अशी मागणी केली. या संदर्भात दखल घेण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !