चोरीच्या पाच दुचाकीसह मालेगावातील चोरट्याला धुळ्यात बेड्या

धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : 85 हजारांच्या पाच दुचाकी जप्त


Malegaon thief with five stolen two-wheelers in chains धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने बसस्थानकातून मालेगावातील कुविख्यात चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. संशयीताने शहरातील विविध भागातून चोरी केलेल्या पाच दुचाकी काढून दिल्या आहेत. निसार शहा पीरन शहा (रा.मास्टर कॉलनी, रमजानपुरा, मालेगाव, जि.नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या अटकेनंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळ्यातील बसस्थानकात संशयीत चोरीची दुचाकी बाळगून असल्याची माहिती गुन्हे शाखेचे नूतन निरीक्षक श्रीराम पवार कळताच त्यांनी पथकाला निर्देश दिले. पथकाने संशयीत निसार शहा यास ताब्यात घेत गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून बोलते करताच त्याने धुळ्यातील सिव्हील हॉस्पीटल परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली तसेच चोरी केलेल्या दुचाकी लळींग शिवारातील कुरणात लपवल्याचे सांगितल्यानंतर पथकाने आरोपीला नेत चार होंडा व एक बजाज कंपनीची मिळून 85 हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या.

यांनी आवळल्या मुसक्या
धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, योगेश राऊत, अमरजीत मोरे, रवींद्र बागुल, संजय पाटील, संतोष हिरे, रवीकिरण राठोड, सुशील शेंडे, निलेश पोतदार, गुणवंत पाटील, सागर शिर्के आदींच्या पथकाने संशयीताच्या मुसक्या आवळल्या.


कॉपी करू नका.