पंतप्रधानांच्या हाकेला साद देत यावल शहरात ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण
भाजपा वैद्यकिय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ.कुंदन फेगडे यांचा उपक्रम
यावल : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला ‘एक पेड माँ के नाम’ या अंतर्गत वृक्षरोपणाचे आवाहन केले आहे. त्यांच्या हाकेला साद देत मंगळवारी यावल शहरात भाजपा वैद्यकिय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ.कुंदन फेगडे यांनी वृक्षारोपण केले. आपल्या निवासस्थानाच्या मागील बाजूस वृक्षारोपण करीत त्यांचे संगोपनदेखील करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
वृक्षारोपण करण्याचे आवाहन
मोठ्या प्रमाणात वाढत असलेले तापमान पाहता निसर्गाच्या संवर्धनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरीकांना वृक्षारोपणाचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे ‘एक पेड माँ के नाम’ असे अभियान पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली देशभर राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यानिमित्त यावल येथील भाजपाचे वैद्यकिय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस युवा नेते डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांनी आपल्या आई कलावती सुधाकर फेगडे यांच्या नावाने व त्यांना सोबत घेत त्यांच्या निवासस्थानाच्या मागे वृक्षरोपण केले. याप्रसंगी डॉ. प्रशात जावळे यांचीदेखील उपस्थिती होती. ही मोहिम निसर्ग वाचविण्यासाठी आहे. प्रत्येक नागरीकाने या मोहिमेमध्ये सामील होऊन वृक्षारोपण करावे, असे आवाहनदेखील प्रसंगी भाजपा युवा नेते डॉ.कुंदन फेगडे यांनी केले.





