महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला जागतिक ओळख देणारा अर्थसंकल्प : अमोल जावळे


भुसावळ : देशातील गरीब, महिला, शेतकरी आणि युवा या चार जातींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विकासाचे लाभ या वर्गांतील अखेरच्या स्तरापर्यंत पोहोचविणारा राज्याचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आलेल्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या जातील, असे भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी व्यक्त करीत राज्य अर्थसंकल्पाचे स्वागत केले.

कृषी क्षेत्राला संजीवनी
शेतकर्‍यांना समस्या मुक्तीसाठी भरघोस मदतीची हमी देतानाच सौरउर्जा पंप देण्याची महायुती सरकारची घोषणा राज्याच्या कृषी क्षेत्रास संजीवनी देणारी ठरणार आहे. मागेल त्याला सौरऊर्जा पंप आणि अखंडित वीजपुरवठ्याची हमी देणार्‍या सरकारच्या या योजनेमुळे तसेच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेमुळे समस्याग्रस्त शेतकर्‍यास मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून महायुती सरकार राबवत असलेल्या मोहिमेस वेग येणार आहे. युवक, महिला, दुर्बल घटक, उपेक्षित, आदिवासी, बेरोजगार, विद्यार्थी, श्रमजीवी, कामगार, नोकरदार, अशा सर्व घटकांच्या जीवनशैलीत थेट सुधारणा घडवून आणणार्‍या अनेक योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, उद्योग, पायाभूत सुविधा, अशा अनेक क्षेत्रांत विकासाचे नवे वारे वाहणार आहेत. महिलांचे आरोग्य व पर्यावरण संवर्धन हे दोन्ही साध्य करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. एका बाजूला सर्वांगीण सामाजिक विकासासोबतच पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता आखलेल्या योजनांमुळे विकासाच्या वाटचालीचा वेग वाढला आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !