राहुल गांधींच्या वक्तव्याने हिंदू धर्माचा अपमान : शिशिर जावळे
सनातन धर्मातील हिंदूंची त्वरित नाक घासून माफी जाहीर माफी मागा अन्यथा व्यापक जनआंदोलन
भुसावळ ः दिल्लीतील पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण भारतीय जनता पार्टी हिंदू नाही , हिंदू हिंसाचारी नसतो असे वक्तव्य करून नवीन वाद निर्माण केला आहे. सत्ता स्थापनेनंतर प्रथमच संसदेचे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे संसदेचे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी विरोधी पक्षाचे काँग्रेसचे नेता खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतीय जनता पार्टी हिंदू नाही, हिंदू हिंसाचारी नसतो, असे म्हटले आहे.
जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य
भारतीय जनता पार्टीचे करोडो सदस्य पदाधिकारी कार्यकर्त्यांचा नेत्यांचा हा घोर अपमान आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य हिंदू धर्मविरोधी जातीय तेढ निर्माण करणारे असून समस्त हिंदूंचा सनातन धर्माचा हा फार फार मोठा अपमान असल्याचा दावा भुसावळचे शिशिर जावळे यांनी केला आहे. लोकसभेत सभागृहात त्यांनी नियमबाह्यम भगवान शिवाचा फोटो, शिवलिंग, त्रिशूल यासह काही देवी-देवतांचे, गुरूंचे फोटो, चिन्ह साहित्य सभागृहामध्ये भाषणदरम्यान दाखवलं याबाबत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी वारंवार त्यांना देवी-देवतांचे फोटो यांचा वापर करू नका, त्यांचा सन्मान करा, सभागृहात संसदेचे सदस्यांना अशा प्रकारचे फोटो, झेंडे किंवा एखादी खूण दाखवण्यास परवानगी नाही मात्र राहुल गांधी यांनी अशा प्रकारे सभागृहामध्ये समस्त हिंदू धर्मियांचा सनातन धर्माचा अपमान केला आहे.

हा अपमान भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सर्व हिंदू सहन करणार नाही. राहुल गांधींचं हे वक्तव्य हिंदू विरोधी आहे. राहुल गांधींनी संपूर्ण सनातन धर्माची हिंदूंची त्वरित नाक घासून माफी जाहीर मागावी अन्यथा या विरुद्ध व्यापक स्वरूपात आंदोलन केले जाईल, असे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.




