भुसावळात माफियांकडून गौण खनिजाची लूट : महसूल प्रशासनाची चुप्पी

शहर व परिसरातील टेकड्या साफ : प्रदेश काँग्रेस कमेटीचे निवेदन


भुसावळ  : भुसावळ  शहर व परिसरातील ग्रामीण भागातील टेकड्यांमधून अवैध गौण खनिज माफियांनी अहोरात्र गौण खनिजाचा उपसा चालवून टेकड्या साफ केल्या आहेत. महसूल प्रशासनाकडून मात्र कारवाई होत नसल्याने गौण खनिज माफियांचे चांगलेच फावले आहे. अवैध गौण खनिजाच्या सुरू असलेल्या वाहतुकीमुळे लोकांची घरे पडण्याची भीती असून आतातरी महसूल प्रशासनाने जागे व्हावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीतर्फे प्रांताधिकारी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

तर तीव्र आंदोलन
भुसावळ शहर महसूल परिसरातील गौण खनिज उत्खनन व वाहतूक या संदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी गौण खनिज उत्खनन व वाहतूक या संदर्भात व परिसरातील जनतेला होत असलेला त्रास या संदर्भात चर्चा करण्यात आली. प्रांताधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार लुटे यांनी निवेदन स्वीकारले. संबंधित विषयांमध्ये लक्ष घालून कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्रसिंह पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रहिम कुरेशी, भुसावळ शहर काँग्रेस युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष ईस्माईल गवळी, महाराष्ट्र प्रदेश मागासवर्गीय विभागाचे सचिव सुनील जवरे, जिल्हा ह्यूमन राइट्स विभागाचे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कुरेशी (भुसावळ), शहर सेवा दलाचे माजी अध्यक्ष तस्लीम खान, महाराष्ट्र प्रदेश भटक्या विमुक्त जाती विभागाचे काँग्रेसचे प्रदेश सचिव सुधाकर बडगुजर उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !