नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे किशोर दराडे विजयी


नाशिक : अत्यंत चुरशीच्या झालेलल्या विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे विजयी झाले आहेत. दराडे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अपक्ष विवेक कोल्हे आणि महाआघाडीचे संदीप गुळवे यांचा नऊ हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला. निवडणूक निकालानंतर विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार किशोर दराडे यांचं अभिनंदन केले.

प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी
दुसर्‍या फेरीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे सुमारे 8 हजार मतांनी आघाडीवर होते मात्र प्रथम पसंतीच्या संभाव्य मतांचा कोटा पूर्ण होत नसल्याने दुसर्‍या पसंतीची मते मोजावी लागली. दुसर्‍या फेरीअखेर दराडे आघाडीवर होते. शिंदेसेनेचे उमेदवार किशोर दराडे, उद्धवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. संदीप गुळवे आणि अपक्ष विवेक कोल्हे यांच्यात मतमोजणीत चुरस असली तरी बाद मतांच्या घोळामुळे अधिकृत कोटा घोषित न करता सर्वप्रथमच सर्वच प्रथम पसंतीची मते मोजण्यात आली.


अंबड येथे मतमोजणी
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात सोमवार, 1 जुलै रोजी पार पडली. सकाळी आठ वाजता मतमोजणीची सुरुवात झाल्यानंतर पहिल्या अर्धा तासातच 3 मतदान केंद्रात जास्त मतपत्रिका आढळल्याने गोंधळ उडाला. उद्धव सेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, वसंत गीते, विनायक पांडे यांनी त्यास हरकत घेतली, त्यानंतर त्या केंद्रातील मतपेटी बाजूला ठेवण्यात आली. त्यानंतर सुरळीत झालेल्या मतमोजणीत पहिल्या 30 हजार मतपत्रिका मोजून त्यातील बाद झालेल्या मतपत्रिका बाजूला काढण्यात आल्या. त्यानंतर मतमोजणी सुरू करण्यात आली. अर्थात बाद मतांवर घेण्यात आलेले आक्षेप आणि वाढीव मते यामुळे अधिकृत बाद मतांची घोषणा न करताच मतमोजणी करण्यात आली. यावेळी उमेदवारांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. औद्योगिक वसाहत परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

अशी झाली मतमोजणी…
प्रथम सर्व मतपत्रिका जमा करण्यात येऊन त्यातून बाद मतपत्रिका बाजूला ठेवण्यात आल्या.

उमेदवाराच्या अनुक्रमांकनुसार करण्यात आलेल्या कप्प्यांमध्ये प्रत्येकाच्या प्रथम पसंतीच्या मतपत्रिका टाकण्यात आल्या. त्यात महायुतीचे किशोर दराडे दोन्ही फेरीत आघाडीवर होते.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !