वरणगावात समांतर महामार्ग मंजूर करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको


वरणगाव : वरणगाव शहरात रेल्वे स्टेशन ते तिरंगा सर्कलचा रस्ता आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाला आहे. या रस्त्यामध्ये डिव्हायडरसह लाईट टाकण्यात यावे तसेच वरणगाव शहर महामार्ग फुलगाव फाटा ते सेवा मंदिर हा रस्ता मंजूर करावा, शहरातील रस्त्याच्या कडेला असलेले पोल आणि डीपी काढण्यात यावी आदी मागण्यांसाठी बुधवारी वरणगाव तिरंगा सर्कल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

डिव्हायडर टाकण्याचे आश्वासन
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने सहाय्यक अभियंता सी.जे.तायडे, पवन अहिराव, उपकार्यकारी अभियंता गणेश जामकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरतकुमार चौधरी, मुख्याधिकारी सचिन राऊत यांच्यासह संपूर्ण अधिकारी उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता कोरे साहेब यांनी फोनवरून मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे डिव्हायडर तिरंगा सर्कलपर्यंत टाकण्यात येतील व त्यामध्ये लाईट लावण्याचे काम सुद्धा तातडीने करण्यात येईल, अशी लेखी हमी दिल्यानंतर रस्ता रोको दोन तासानंतर मागे घेण्यात आला.


यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपाचे अध्यक्ष सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी, बळीराम सोनवणे, मयूर शेळके, भाजपा तालुकाध्यक्ष शामराव धनगर, भाजपा नेते संजयकुमार जैन, संदीप माळी, हाजी अल्लाद्दीन सेठ, नामदेव सोनवणे, गणेश चौधरी, मुस्लिम अंसारी, फजल शेख, अजमल खान, उपनगराध्यक्ष अखलाख शेख, युसूफ कामगार नेते मिलिंद मेढे, ईरफान पिंजारी, युसूफ खान, गोलू राणे, संतोष पाटील, नंदू जोशी, विविध कार्यकारीचे संचालक अनिल वंजारी, शेख, डॉ.नाना चांदणे, योगेश माळी, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष आकाश निमकर, ज्येष्ठ नेते मनोहर सराफ, शालिग्राम डोयसे, हाजी अल्लाउद्दीन शेठ, नितीन गोसावी, राजू चौधरी, किरण कोलते, अरुण इंगळे, शांताराम माळी, युसूफ खान, भोजराज पालवे, दीपक चौधरी, गजानन लोहार, साबीर कुरेशी, संदीप सोनवणे, श्यामकुमार बावणे, चैतन्य बागुल, नरेंद्र बावणे, योगेश बावणे, किरण वंजारी, जामनेरचे नामदेव चौधरी, किरण भैसे, सर्व रिक्षा चालक-मालक युनियनचे विकी मेढे, कल्पेश चौधरी, स्वप्निल चौधरी, चेतन पाटील, सुधाकर बावणे, गोलू निंबाळकर, राजा कलीम शेख, सविता माळी, कलाबाई माळी, सविता वंजारी यांच्यासह महिला आघाडी युवा मोर्चाचे संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !