शाळांची वेळ पूर्ववत करा : भुसावळातील शिक्षण विभाग कार्यालयावर मोर्चा


भुसावळ  : भुसावळ शहरासह ग्रामीण भागातील शाळांची वेळ पूर्ववत करण्यासाठी शहरातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयावर गुरुवार 4 जुलै रोजी दुपारी चार वाजता संविधान आर्मीतर्फे आक्रोश मोर्चा काढला होता, कार्यालयात गेल्यावर ठीय्या आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांनी केले.

घोषणांनी परिसर दणाणला
शहरातील गांधी पुतळ्यापासून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. या मोर्चात बहुसंख्य आंदोलक हे विद्यार्थी वाहतूक करणारे चालक होते. शाळेची वेळ बदललीच पाहीजे या घोषणांनी परिसर दणाणला होता. हा मोर्चा गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयावर गेला. शिक्षण विभागाचे कार्यालयातही शाळेची वेळ बदललीच पाहिजे या घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी शाळेची वेळ बदल करा, मुलांवर अन्याय करू नका, सकाळच्या वेळेस मुलांना ऑक्सीजन चांगला मिळत असल्याने आंदोलक म्हणाले. पूर्वी शाळांची वेळ ही सकाळी 7 ते 8 या वेळात होती. ती आता नऊ वाजता करण्यात आल्याने अनेक अडचणी निर्माण होतात, प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या भरणे आणि सुटण्याचे अंतर एक तासाच्या फरकाने झाले आहे. यामुळे वाहन धारकांना दोन फेर्‍या करणे शक्य होत नाही, त्यातच बाहेरगावाहून येणार्‍या वाहनांची संख्या ही सुमारे 60 वर असल्याने शाळा भरण्यामध्ये एक तासाचा फरक असल्याने एकत्रीतपणे विद्यार्थी आणता येत नसल्याने शिक्षण विभागाने पहिलीच वेळ ठेवावी, अन्यथा आंदोलन तीव्र स्वरूपात छेडले जाईल, असाा इशारा जगन सोनवणे व त्यांच्या सहकार्‍यांनी दिली.


वेळ न बदलल्यास तीव्र आंदोलन
शाळांच्या वेळत बदल न केल्यास त्या शाळांना कुलूप ठोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी सोनवणे व आंदोलकांनी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे समस्या मांडल्यात व वेळेत बदल केला जाईल, असे लेखी घेऊन आंदोलन मागे घेतले. यावेळी विस्तार अधिकारी बी.डी.धाडी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !