लाडकी बहिण योजना : ऑनलाईन रेशन कार्डाची अट शिथिल करा

भुसावळातील शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


भुसावळ : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली. महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार असून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन रेशनकार्डाची अट असून ती रद्द करावी, अशी मागणी भुसावळातील शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ऑनलाईन रेशनकार्डाची अडचण
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत राज्यातील अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या केशरी, पिवळे रेशन कार्डधारक महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. सरकारकडून योजनेसाठी विविध कागदपत्रांच्या अटी घालण्यात आल्या आहेत. योजनेसाठी पात्र महिलांना रेशन कार्ड सुद्धा अनिवार्य करण्यात आले आहे. त्यात रेशन कार्ड ऑनलाईन असेल अशांचीच या योजनेसाठी नोंदणी होत आहे मात्र राज्यातील बरेच केशरी रेशन कार्ड धारक यांच्याकडे बारा अंकी नंबर नसल्यामुळे त्यांचे रेशन कार्ड ऑनलाईन झालेले नाही. ऑनलाईन रेशन कार्ड करण्यासाठी प्रक्रियेला कमीत कमी 25 ते 30 दिवसांचा अवधी लागतो. त्यातल्या त्यात तहसील कार्यालयांमध्ये सदर ऑनलाईन रेशन कार्ड करण्यासाठी तीन ते चार महिने सुद्धा लावले जातात. रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी बारा अंकी नंबर घेऊन यासाठी नागरिकांना वर्षभर प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे बरेच रेशन कार्ड धारक रेशन कार्ड ऑनलाईन करण्या बाबत उदासीन आहेत. ऑनलाईन रेशन कार्ड नसलेल्या केशरी कार्ड धारक महिला-भगिनी या योजनेपासून वंचित राहण्याची भीती असून तसे झाल्यास हा त्यांच्यावर अन्याय होईल. योजनेचा लाभ ऑनलाइन नसलेल्या केशरी कार्ड धारक महिलांना सुद्धा मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव शिशिर दिनकर जावळे यांनी केलीे आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !