विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात प्रयत्नांची शिकस्त करावी : नरेंद्र नारखेडे
फैजपूर : विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात प्रयत्नांची शिकस्त करून उज्वल यश संपादन करावे व विविध सुसंस्कारांनी आपले व्यक्तिमत्व आदर्श बनवावे. आत्मनिर्भर होणार्या भारत देशात या माध्यमातून युवकांनी देश मजबूत करावा. भविष्यात भारत देश हा विश्वगुरू होणार असून यासाठी युवकांचा सहभाग महत्त्वाचा असणार असल्याचे प्रतिपादन यावल शेतकरी संघाचे सभापती नरेंद्र नारखेडे यांनी येथे केले. शहरातील श्री लक्ष्मी नागरी पतसंस्थेकडून सामाजिक उपक्रमांतर्गत शुक्रवारी दुपारी म्युनिसीपल हायस्कूलमधील गरीब निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दप्तर-वह्या वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यांची प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.जी. पाटील, लक्ष्मी नागरी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन मनोजकुमार पाटील, संचालक अनिल नारखेडे, अप्पा चौधरी, सुरेश परदेशी, विजय परदेशी, खेमचंद नेहेते, निळकंठ सराफ, भास्कर बोंडे, मुख्याध्यापक के.टी.तळेले, पर्यवेक्षक संजय सराफ, ए.के.महाजन, सी.ल.धांडे व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन बी.डी.महाले यांनी केले. राजेंद्र मानेकर, राजेंद्र मिस्तरी, मनोज वायकोळे, जयश्री चौधरी व म्युनिसिपल हायस्कूलचे शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

शिक्षक हे विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान
विद्यार्थ्यांचे शिक्षक हे प्रेरणास्थान असून विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे बाळकडू घ्यावे, असे प्राचार्य डॉ.के.जी.पाटील म्हणाले. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासत श्री.लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेकडून दरवर्षी फैजपूर परिसरात हा शालेय उपक्रम गरीब निराधार विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत आहे. यापुढे या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यात येईल अशी माहिती यावेळी श्री.लक्ष्मी नागरी पतसंस्थेचे चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी दिली.




