धुळे एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी सचिन साळुंखे

पदभार स्वीकारला : तत्कालीन उपअधीक्षक अभिषेक पाटील यांची बदली


Sachin Salunkhe as new Deputy Superintendent of Police, Dhule ACB धुळे : धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांची कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर धुळे जिल्हा पोलीस दलात बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथून सचिन साळुंखे यांची धुळे एसीबीत पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली. साळुंखे यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.

धुळे जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क
पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातही एक वर्ष काम केले आहे तर धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, ता.साक्री व थाळनेर, ता.शिरपूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक असताना सेवा बजावल्याने त्यांना धुळे जिल्ह्याची इत्यंभूत माहिती आहे. या दांडग्या जनसंपर्काचा धुळे एसीबीत काम करताना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान,

तक्रारदारांनी निसंकोचपणे पुढे यावे : पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे
‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे म्हणाले की, एसीबीचा नुकताच पदभार स्वीकारला आहे. शासकीय कार्यालयात शासकीय अधिकारी वा नोकर स्वतः वा खाजगी पंटरांच्या माध्यमातून शासकीय कामे करून देण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तक्रारदारांनी मनात कुठलीही भीती न बाळगता निसंकोचपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1064 किंवा धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाच्या 02562-234020 तसेच वैयक्तिक आपला भ्रमणध्वनी क्रमांक 9403747157 व 9834202955 यावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.


कॉपी करू नका.