स्व. मधुकरराव चौधरी यांचे कार्य सदैव प्रेरणादायी : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण


रावेर : माजी विधानसभा अध्यक्ष स्व.मधुकरराव चौधरी यांनी त्यांना मिळालेल्या राजकीय शक्तीचा वापर गोरगरीब जनता, शेतकरी, कष्टकरी यांच्या हितासाठी केला. जिल्ह्यात अनेक धरणांबरोबरच इतर प्रकल्प आणले. राज्याचे शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी प्रचंड काम केले. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी केलेले कार्य आपल्या सदैव प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तालुक्यातील खिरोदा येथे केले.

मान्यवरांचा सहृदयी सत्कार
विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन आमदार शिरीष चौधरी यांच्यावतीने खिरोदा येथे करण्यात आले. कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. केळीचा पीक विमा योजनेत समावेश केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा केळीचा घड देऊन सत्कार करण्यात आला.


यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार शिरीष चौधरी, युवा नेता धनंजय चौधरी, उद्योजक श्रीराम पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, दिलीप सोनवणे, सुधीर तांबे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष हरीष गणवाणी, कृउबा सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, उबाठा शिवसेनेचे योगीराज पाटील उपस्थित होते.

सत्काराने प्रेरणा
कोरोना काळात अतिशय कठीण परिस्थितीत होती. अचानक मोठे संकट आले होते. मी आरोग्यमंत्री होतो. आपण समाजाचे देणे लागतो. मी काम आणि कर्तव्याला प्राधान्य कामात झोकून दिले त्यामुळे चांगले काम करू शकलो. आज कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल सत्कार झाल्याने मला प्रेरणा मिळाली. या प्रोत्साहनामुळे सकारात्मक काम करित राहू, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.

धनंजय चौधरी यांना संधी द्या
धनंजय चौधरी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता दिसून येत असल्याने त्यांना मिळालेल्या वारसाच्या वापर जनतेच्या हितासाठी करतील. आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र युवानेता धनंजय चौधरी यांना येत्या विधानसभा निवडणुकीत संधी द्यावी, असे आवाहन सर्वच वक्त्यांनी केले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !