तीन हजारांची लाच भोवली : धुळे वनविभागाचा वनपाल एसीबीच्या जाळ्यात


Bribe of 3000 rupees : Forester of Dhule forest department in ACB’s net धुळे : लाकूड वाहतुकीची परवानगी देण्यासाठी तीन हजारांची स्वीकारताना धुळे वनविभागाच्या लेखापालास धुळे एसीबीने अटक केली आहे. किरण गरीबदास अहिरे (43, प्लॉट नंबर 19, संत कबीर नगर, देवपूर, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. हा सापळा गुरुवार, 11 रोजी सायंकाळी यशस्वी करण्यात आला.

असे आहे लाच प्रकरण
40 वर्षीय तक्रारदार यांना सागाची झाडे तोडून लाकूड वाहतुकीची परवानगी मिळणे करिता वनक्षेत्र पाल, धुळे कार्यालयाकडे अर्ज केला होता. परवानगी मिळणे करता तक्रारदार हे उपवनसंरक्षक कार्यालय धुळे येथे जाऊन वेळोवेळी पाठपुरावा करीत असताना लेखापाल यांनी लाकूड वाहतुकीच्या परवानगीचे काम करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तीन हजारांची मागणी केल्यानंतर एसीबीकडे तक्रार करण्यात आली व पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला. लाच स्वीकारताच लेखापालाला अटक करण्यात आली. दरम्यान, लेखापालाकडे परवानगीचा विभाग नसल्याने लाच प्रकरणात आता अनेकांची चौकशी शक्य असून बड्यांवरही कारवाईची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, मकरंद पाटील, चालक बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.


कॉपी करू नका.