भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर दगडफेक !


जळगाव : भुसावळ-नंदुरबार रेल्वे पॅसेंजरची चेन पुलिंग करून सुमारे अर्धा तास पॅसेंजर थांबवून तिच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची माहिती आहे. सुदैवाने ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

समाजकंटकाकडून दगडफेक
शुक्रवार, 12 जुलै रोजी अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरूस असल्याने हजारो भक्तांची गर्दी होती. भुसावळहुन नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्टेशनवरून सकाळी 11 वाजता सुटली असताना रेल्वे मध्ये हजारो यात्रेकरू बसले.

काही यात्रेकरूंनी भोरटेक रेल्वे स्टेशनपूर्वी धार टेकडीच्या जवळ साखळी ओढल्याने रेल्वे जागेवर थांबली. हजारो यात्रेकरू त्याठिकाणी उतरले आणि काही समाज कंटकांनी रेल्वेवर दगडफेक केल्याचे समोर आले आहे.या दगडफेकीमुळे पॅसेंजर मध्ये उपस्थित प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेचा एक व्हिडिओ हा सोशल मीडियाचा व्हायरल झाला आहे.


कॉपी करू नका.