भुसावळ रोटरी क्लब अध्यक्षपदी अनंत पाटील तर सचिवपदी आरती चौधरी
भुसावळ पदग्रहण समारंभातच गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दप्तर, रेनकोट वाटप
भुसावळ : रोटरी क्लब भुसावळच्या नूतन अध्यक्षपदी अनंत पाटील तर सचिवपदी आरती चौधरी यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकार्यांनी पदग्रहण केल्यानंतर कन्हाळे येथील शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शाळेचे दप्तर व रेनकोटचे वाटप रोटरी हॉलमध्ये करण्यात आले.
नूतन पदाधिकार्यांनी स्वीकारला पदभार
रोटरी हॉलमध्ये शुक्रवारी रोटरी क्लब भुसावळच्या पदग्रहण सभारंभाचे आयोजन करण्यात आले. नेहा खाचणे या विद्यार्थीनीने नृत्य सादर करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी विकास कात्यायनी यांनी मागील वर्षाचा आढावा घेतला व काय कार्यक्रम केले याची थोडक्यात माहिती सांगितली. नूतन अध्यक्ष अनंत पाटील यांनी येत्या वर्षात घेण्यात येणार्या कामांची माहिती दिली त्यांनी सांगितलं की, वृक्ष लावण्यापेक्षा जे वृक्ष आहेत त्यांचे आम्ही संवर्धन करू त्यांना कंपाउंड घालून नंतर खत, पाणी वगैरे देऊन त्या वृक्षांचे संवर्धन करू. समाजातील गरीब लोकांच्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याचे ही महत्त्व लक्षात घेऊन त्याविषयी उपक्रम घेऊ. शाळेतील मुलांसाठी विशेष काम करणाार असल्याचे सांगितले. यावेळेस कन्हाळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना दप्तर व रेनकोट वाटप करण्यात आले.

सामाजिक कार्याची दिली माहिती
डॉ.अतुल सरोदे यांनी आपल्या भाषणात रोटरीचे सामाजिक काम करताना, कौटुंबिक व व्यावसायिक जबाबदार्या या सगळ्याची सांगड कशी घालावी हे अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं. त्यानंतर असिस्टंट गव्हर्नर गजानन ठाकूर यांनी प्रांतपाल खुराणा यांचा संदेश वाचून दाखवला तसेच राजीव शर्मा यांनी आपल्या भाषणात रोटरी क्लब ऑफ भुसावळच्या कामाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगावचे डॉ.राजेश पाटील यांनी रोटरीचे सामाजिक काम कसे करायचे याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ.नारायण आर्वीकर तर आभार सचिव आरती चौधरी यांनी मानले.
रोटरीचे संचालक मंडळ 2024-25
अध्यक्ष अनंत पाटील, उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, सह उपाध्यक्ष संजय चापोरकर, सेक्रेटरी आरती चौधरी, जॉइंट सेक्रेटरी सारंग चौधरी, ट्रेझरर मदन बोरकर, एक्झिक्यूटिव्ह सेक्रेटरी गिरीश कुलकर्णी, सार्जंट अँट आर्म प्रदीप दवे, आय.पी.पी.विकास कात्यायनी, बोर्ड मेंबर्स डॉ.नारायण आर्वीकर, आशिष अग्रवाल, गजाजन ठाकुर, प्रा.निता चोरडिया, राजेश अग्रवाल, महेश भराडे, मंगला पाटील, दिलीप खंडेलवाल, गोपाल तिवारी यांचा समावेश आहे. सल्लागार समितीत ब्रिजमोहन अग्रवाल, पांडुरंग राव, राधेश्याम लाहोटी यांचा समावेश आहे.




