भुसावळातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात पालक-शिक्षक सभा


भुसावळ : शहरातील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात पालक-शिक्षक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. इतिवृत्ताचे वाचन चिटणीस विश्वेश पाटील यांनी वाचून मंजूर केले. दहावीतील गुणवंत विद्यार्थिनींचा तसेच त्यांच्या पालकांचा सत्कार पालक-शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आला.

कार्यकारिणी सदस्यांची निवड
2024-2025 वर्षासाठी पालक व शिक्षक कार्यकारणी सदस्यांची निवड करण्यात आली. स्पर्धा परीक्षेची माहिती पल्लवी चौधरी तर संस्कृत विषयाबद्दलची माहिती आशिष निरखे, क्रीडा स्पर्धेबाबत अजय डोळे, डिजिटल क्लासरूमबाबत भूषण भंडारी, बालनाट्य स्पर्धेबाबत विनोद उबाळे, शारदोत्सव शैक्षणिक सहलीबाबत सरोज कोष्टी यांनी माहिती सांगितली. पर्यवेक्षक संजीव पाटील यांनी आपल्या मनोगतात पालकांनी किमान महिन्यातून एक किंवा दोन वेळा वर्ग शिक्षकांना भेटून आपल्या मुलीच्या शैक्षणिक प्रगतीविषयी चर्चा करण्याचे आवाहन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शाळेमध्ये विविध उपक्रमांचा आयोजन केले जात असल्याचे सांगून मुलींना या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन विश्वेश पाटील तर आभार नवनिर्वाचित सचिव योगीता पाटील यांनी मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !