दरोड्यातील आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


जळगाव : तळोदा, जि.नंदुरबार पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. आशिष विलास तायडे (25, निमगाव, ता.यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून अटक
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना जळगाव जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील गंभीर गुन्हयातील फरार आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रमोद लाडवंजारी व हवालदार किरण धनगर यांना यावल भागातील संशयीत पकडण्याचे आदेश मिळाल्यानंतर त्यांनी तळोदा पोलीस स्टेशनला गुरनं. 31/2023 भादंवि कलम 395, 394, 342, 506 प्रमाणे दाखल दरोड्याच्या गुन्हयातील आरोपी आशिष तायडे यास अटक केली.

तळोदा, जि.नंदुरबार पोलिसांना माहिती कळवल्यांनतर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे हवालदार देविदास वडवी सोबत पोलीस पथक आल्याने गुन्हयाच्या पुढील तपासाकामी आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.


कॉपी करू नका.