छगन भुजबळांना पुन्हा पक्षात प्रवेश नाहीच : अनिल देशमुखांनी मांडली भूमिका


मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी छगन भुजबळ यांची दुटप्पी भूमिका असल्याने त्यांनी कितीही परतीचे प्रयत्न केले तरी त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश मिळणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. ही पक्षाची भूमिका असल्याचेही ते म्हणाले.

भुजबळ यांची दुटप्पी भूमिका
अनिल देशमुख म्हणाले की, छगन भुजबळ आता दुटप्पी भूमिका घेत आहेत. एकीकडे बारामतीला टीका करायची आणि त्यानंतर शरद पवारांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन मागायचे. ही दुटप्पी भूमिका आहे. काल त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. त्यांनी परतीचे प्रयत्न केले तरी त्यांना परत घ्यायचे नाही ही आमच्या पक्षाची ठाम भूमिका आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा नेत्यांना, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी नेत्यांना आश्वासन देत आहेत. मागील वर्षभरात या दोन्ही समाजाला कोणकोणती आश्वासने दिली, हे त्यांनी सांगावे. कारण आम्हाला याची कोणतीही माहिती नाही. शरद पवार सध्या आजारी आहेत. त्यांची प्रकृती ठीक झाली की, ते नक्कीच या प्रकरणी सरकारला मार्गदर्शन करतील, असे अनिल देशमुख म्हणाले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !