लाडक्या भावांसाठी आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली ‘ही’ योजना : दरमहा इतके रुपये मिळणार !
पंढरपूर : राज्यात लाडक्या बहिण योजनेला मिळालेल्या प्रतिसादानंतर मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरात लाडक्या भावांसाठी योजना जाहीर केली आहे. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार, डिप्लोमा 8 आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्या वेतन देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
यांची होती उपस्थिती
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते.

असे मिळेल योजनेचा लाभ
लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण तरुणांना दर महिन्याला 6 हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला 8 हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. हे तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करतील, तिथे त्यांना कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्यांना नोकर्या मिळतील. एक प्रकारे आपण कुशल कामगार तयार करत आहोत. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून याद्वारे बेरोजगारीवर तोडगा निघणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून याद्वारे बेरोजगारीवर तोडगा निघेल असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.




