मामेभावाच्या खूनानंतर पसार झालेल्या आरोपीला धुळे बसस्थानकात बेड्या

शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : कनगई येथे किरकोळ वादातून मामेभावाचा झाला होता खून


The accused, who escaped after the murder of his maternal uncle, was handcuffed at the Dhule bus station शिरपूर : किरकोळ वादातून मामेभावाशी झालेल्या वादानंतर त्याच्या डोक्यावर विळ्याने वार करण्यात आले होते व उपचारानंतर मामेभावाचा मृत्यू ओढवला होता. खुनाची ही घटना शिरपूर तालुक्यातील कनगई येथे मंगळवार, 16 रोजी रात्री साडेआठ वाजता घडली होती. खुनातील संशयीत राजेश प्रेमसिंग पावरा (27, कनगई, पो.सुळे, ता.शिरपूर, जि.धुळे) हा रत्नागिरी येथे पसार होण्याच्या प्रयत्नात असताना शिरपूर तालुका पोलिसांनी त्यास धुळे बसस्थानकात बेड्या ठोकल्या.

अवघ्या काही तासात आरोपी जाळ्यात
सूत्रांच्या माहितीनुसार, कनगई, ता.शिरपूर येथे रणजीत भाट्या पावरा यास किरकोळ कारणावरून संशयीत राजेश पावरा याने डोक्यावर मागील बाजूने विळा मारून दुखापत केली होती मात्र उपचारादरम्यान रणजीतचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयताचा भाऊ भोंग्या भाट्या पावरा यांच्या फिर्यादीवरुन शिरपूर तालुका पोलिसात संशयीत राजेश पावराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी राजेश पावरा हा पसार झाल्यानंतर तो धुळ्यातून रत्नागिरी येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती शिरपूर तालुका निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. आरोपीला बुधवारी धुळे बसस्थानकातून अटक करण्यात आली. घटनास्थळावरुन फॉरेन्सीक पथकाने गुन्ह्यात वापरण्यात आलेला विळा जप्त केला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, फौजदार कृष्णा पाटील, फौजदार बाळासाहेब वाघ, हवालदार राजु ढिसले, हवालदार संदीप ठाकरे, चालक हवालदार संतोष पाटील, कॉन्स्टेबल संजय भोई, कॉन्स्टेबल योगेश मोरे, कॉन्स्टेबल भूषण पाटील, कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर, कॉन्स्टेबल मुकेश पावरा, कॉन्स्टेबल रोहिदास पावरा, कॉन्स्टेबल जयेश मोरे, कॉन्स्टेबल सुनील पवार, चालक कॉन्स्टेबल ईसरार फारुकी आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.