मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या


Pune rural police handcuffed Manorama Khedkar पुणे : वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मनोरमा यांच्याबाबतचे दोन व्हिडीओ व्हायरल झाले होते. ऑडी कारची नोटीस देण्यासाठी घरी गेलेल्या पोलिसांनाही मनोरमा यांनी वाद घालत दमदाटी केली होती.

पिस्तूल दाखवून दमदाटी केल्याचा आरोप
मनोरमा खेडकर यांनी गेल्या वर्षी मुळशीतील शेतकर्‍यांना पिस्तूल दाखवून दमदाटी केली होती तसेच जमीन हडपण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पौड पोलिसात मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पोलीस खेडकर यांच्या बाणेर येथील निवासस्थानी देखील जाऊन आले होते. परंतू त्या सापडल्या नव्हता.


 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !