भुसावळातील श्री विठ्ठल मंदिरात भाविकांची मांदियाळी


भुसावळ : आषाढीचे औचित्य साधून शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील पुरातन विठ्ठल मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी झाली होती. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. शहरातील सर्वच विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनार्थ गर्दी केली. यावेळी विविध संघटनातर्फे आलेल्या भाविकांना साबुदाणा फराळासह केळीचे वाटप करण्यात आले.

हजारो भाविकांनी घेतले दर्शन
प्राचीन अशा विठ्ठल मंदिरात बुधवारी सकाळी 5.30 वाजता विठ्ठल-रुखमाईच्या मूर्तीला अभिषेक करून आरती करण्यात आली. दिवसभर भजन, हरीपाठाचा कार्यक्रम झाला. यावेळी मंदिरात सकाळपासूनच भाविकांना साबुदाण्याच्या फराळ वाटप करण्यात आला. मंदिराला रंगरंगोटी करून मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे.


आमदारांच्या हस्ते महाआरती
बुधवारी सायंकाळी पाच वाजता नगर प्रदर्शना करण्यात आली तसेच दिंडी काढण्यात आली. दिंडी मंदिरात आल्यावर संध्याकाळी सात वाजता आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. भाविकांना हर्षल दिलीप राणे व देवा वाणी यांच्यातर्फे 200 क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !