भुसावळ पालिकेतील दहा वाहनांचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण

अग्निशमन वाहनांमुळे वेळेत मदत पोहोचणार : आमदार संजय सावकारे


Dedication of ten vehicles of Bhusawal Municipality by MLAs भुसावळ : भुसावळ पलिकेच्या दहा वाहनांचे लोकार्पण आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते गुरुवारी दुपारी करण्यात आले. आमदार सावकारे यांनी पालिका अधिकार्‍यांची यावेळी आढावा बैठक घेत शहरातील समस्यांबाबत चर्चा केली. शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी टोईंग वाहन खरेदी करण्याची त्यांनी सूचना केली तसेच आगामी काळात डीपीडीसीतून शहराला दोन फायर बुलेट मिळणार असल्याचे सांगितले. शहरात आठ ते दहा दिवसाआड होणारा पाणीपुरवठा अस्वच्छ असल्याच्या तक्रारी असल्याने त्याबाबत गांभीर्याने दखल घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केल्या तसेच नवीन अग्शिमन दलातील वाहने जामनेर रोडवरील रंगोली हॉटेलजवळील पालिका जागेत लावण्याचेही सूचवले.

आमदारांच्या हस्ते वाहनांचे लोकार्पण
भुसावळ पालिकेच्या निधीतून तसेच डीपीडीसीमधून तीन अग्निशमन दलाच्या गाड्या, दोन पाण्याचे टँकर, एक ट्रॅक्टर, एक जेटींग मशीन (नाले सफाईसाठी), एक स्प्रिंकलर (फवारणीसाठी), ट्री अ‍ॅम्ब्युलन्स, अ‍ॅनिमल रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण गुरुवारी दुपारी आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले.


टंचाईत वाहनांमुळे नागरिकांना दिलासा
यावेळी आमदार सावकारे म्हणाले की, नवीन अत्याधूनिक वाहनांमुळे नागरिकांना विविधांगी सुविधा मिळणार आहे. पालिकेकडे अधिकचे टँकर झाल्याने नागरिकांना टंचाईच्या काळात पाणी पुरवणे सोयीचे होईल शिवाय अ‍ॅनिमल रेस्क्यू वाहनामुळे मृत व जखमी जनावरांसह प्राण्यांची ने-आण करणे सोयीचे होईल शिवाय ट्री अ‍ॅम्ब्यूलन्समुळे झाडे लावणे व जगवणे आता अधिक सोयीचे होणार आहे. आगामी काळात डीपीडीसीतून पालिकेला दोन फायर बुलेट मिळणार असून त्या अडचणीच्या गल्लीबोळात जावून आग विझवण्यास मदत करतील.

यांची बैठकीला होती उपस्थिती
आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी व प्रशासक जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उपमुख्याधिकारी लोकेश लाढके, उपमुख्याधिकारी परवेज शेख, पाणीपुरवठा अभियंता दीपक चौधरी, अग्निशमन अधिकारी विवेक माकोडे, आरोग्य निरीक्षक प्रदीप पवार, आरोग्य निरीक्षक वसंत राठोड आदींची उपस्थिती होती.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !