भुसावळात भाजपा सरकारच्या विरोधात ठाकरे गटाची निदर्शने
भुसावळ : जम्मूत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झालेत. या अतिरेक्यांचा व केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षातर्फे येथील बाजार पेठ पोलीस स्टेशनसमोर घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.
बाजारपेठ पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने
गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याबाहेर शिवसेना ठाकरे पक्षातर्फे पदाधिकारी एकत्र आले. त्यांनी केंद्र सरकारविरूध्द घोेषणाबाजी केली. भाजपा सरकार हे अतिरेकी हल्ले थांबवण्यास कुचकामी ठरले आहे, अशी टीका शिवसेना शहर प्रमुख दीपक धांडे यांनी केली. यावेळी या निदर्शनात कॅप्टन ब्रिजेश थापा अमर रहे, मोदी सरकार हाय हाय, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे आदी घोषणा उपस्थित पदाधिकार्यांनी दिल्यात. यावेळी शहर प्रमुख दीपक धांडे, विधान सभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन, उपतालुका प्रमुख रहिम गवळी, माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, शरद जयस्वाल आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.





