धुळे शहर पोलिसांची मोठी कामगिरी : सुरत बायपासवर लूट करणारी चौकडी जाळ्यात


धुळे : धुळे तालुक्यातील वारकुंडाणे येथील तरुणाला महामार्गावर मारहाण करीत लूटण्यात आले होते. धुळे शहर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कुविख्यात चौकडीला बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपींकडून गुन्ह्यातील दुचाकीसह मोबाईल मिळून 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

असे आहे प्रकरण
दादाभाऊ बारकु पारधी (33, वार कुंडाणे) हा या तरुणाला 25 जूनला
सुरत बायपासजवळ मारहाण करीत लूटण्यात आले. मोबाईल, एक हजार 600 रुपये जबरीने हिसकावून संशयीत पसार झाले होते. हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार व हिस्ट्रीशिटर असलेला बब्या उर्फ कृष्णा दिनेश गायकवाड (22, रा.राउळवाडी, चितोड रोड, धुळे) व भूषण शिवदास पाचारे (28, नवजीवन नगर, फाशीपुल, धुळे) यांच्यासह अन्य साथीदारांनी केल्याची शहर पोलिसांना मिळाली होती. संशयीत मोहाडीनगर पोलीस ठाण्यात दाखल एका गंभीर गुन्ह्यात अटकेनंतर कारागृहात असल्याने त्यांना ताबा घेण्यात आला.

पोलीस चौकशीत आरोपी भूषण पाचारे याने साथीदार रोहन अवचित्ते व सागर प्रजापती यांच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने शोध घेत रोहन अनिल अवचित्ते (22, रा.खंडेराव महाराज मंदिराजवळ, चितोड रोड, धुळे), सागर जगदीश प्रजापती (22, रा.नवजीवन ब्लड बँकेच्यामागे, सुशीलनगर, धुळे) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी लुटीची कबुली दिली. तसेच गुन्ह्यातील चोरी केलेली रक्कम हिस्ट्रीशिटर बब्या उर्फ कृष्णा गायकवाड यास सोपवुन मौजमस्ती केल्याचे सांगितले. पोलिसांनी भुषण पाचारे यांच्या घरातुन फिर्यादीचा पाच हजारांचा मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (क्र. एम.एच.18 ए.यु.8335) जप्त केली. अटकेतील चौकडीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सुर्यवंशी करीत आहेत.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
जबरी लुटीचा गुन्हा धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधीक्षक ऋषीकेष रेड्डी, धुळे शहरचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील बाळासाहेब सुर्यवंशी, दिनेश परदेशी, सचिन गोमसाळे, रवींद्र गिरासे. कुंदन पटाईत, शाकीर शेख, महेश मोरे, प्रवीण पाटील, मनीष सोनगिरे, तुषार पारधी, अमित रनमळे, वसंत कोकणी, अमोल पगारे, योगेश ठाकुर, चालक दीपक सैंदाणे यांच्या पथकाने उघडकीस आणला.

 


कॉपी करू नका.