खासदार संजय राऊत स्पष्टच बोलले : आम्ही सिनेमा काढला तर तोंड लपवावे लागेल !
मुंबई : शनिवारी धर्मवीर 2 चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राजकीय भूमिकेवर खोटे चित्रपट काढले जात असून आम्ही सिनेमा काढला तर तोंड लपवून फिरावे लागेल.
हा तर दिघेंसह बाळासाहेबांचा अपमान
आज गुरु पौर्णिमा आहे. सत्य बोलून प्रामाणिकपणे जगा ही बाळासाहेबांची शिकवण होती. जर बेईमान लोकं आनंद दिघे यांना गुरु मानून त्यांचे खोटे चित्र उभे करत असतील तर तो दिघेंसह बाळासाहेबांचाही अपमान असल्याचे खासदार राऊत म्हणाले. आम्ही आनंद दिघे यांना जास्त ओळखतो. आज जे लोक आनंद दिघे यांच्यावर मालकी सांगत आहेत त्यांच्याच मनात आनंद दिघे यांच्या विषयी काय भावना होत्या हे आम्हाला माहित आहे. आम्ही अशा प्रकारचे चित्रपट काढले तर त्यांना तोड लपवून फिरावे लागेल.

राऊत म्हणाले, पहिल्या चित्रपटात आनंद दिघे यांचे महानिर्वाण दाखवले आहे. त्यांचे महानिर्वाण पहिल्या भागात दाखवल्यानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो? विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत. आपली बेईमानी झाकण्यासाठी दिघे यांच्यासारख्या निष्ठावान नेत्यांचा वापर करणे सुरू आहे”, असे राऊत म्हणाले.




