बोराडीत एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न : त्रिकूट जाळ्यात

शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कामगिरी : गुन्ह्यातील क्रुझर वाहनही जप्त


Attempt to break SBI ATM in Boradi : Trio in the net शिरपूर : शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील बोराडी गावातील एसबीआय बँकेचे एटीएम दोर बांधून लांबवण्याचा प्रयत्न झाला होता. ही घटना 19 रोजी रात्री अडीच वाजता घडली होती. सुदैवाने ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केल्यानंतर भामट्यांनी एटीएम जागेवर टाकून पळ काढला होता. सीसीटीव्ही रेकॉर्डमध्ये हा प्रकार कैद झाल्यानंतर खंबाळे गावातील संशयीत तसेच अन्य दोन आरोपी व गुन्ह्यातील वाहन व शिरपूर तालुका पोलिसांनी जप्त केले आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयीतासह अन्य तिघे पसार असून त्यांचाही कसून शोध सुरू आहे.

ग्रामस्थांना जाग आल्याने टळली चोरी
बोराडी गावात एसबीआयचे एटीएम असून शुक्रवारी पहाटे भामट्यांनी क्रुझर वाहनाला दोर बांधून एटीएम लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र आवाज आल्यानंतर ग्रामस्थांना जाग आल्यानंतर आरडा-ओरड केल्यानंतर भामटे वाहनासह पसार झाले. बीट अंमलदार कैलास जाधव व कॉन्स्टेबल मनोज नेरकर यांना गुन्ह्यातील वाहन खंबाळे गावातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शिरपूर तालुका निरीक्षक जयपाल हिरे यांना माहिती दिली व त्यांच्या आदेशानंतर पथक रवाना झाले. गाडी मालक मगन पवार यांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी मुलगा योगेश याने घटनेच्या दिवशी वाहन नेल्याची कबुली दिल्यानंतर योगेश पवार यास ताब्यात घेण्यात आले व त्याने अन्य दोन साथीदारांची नावे सांगितल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. तपासार्थ पोलिसांनी आरोपींची नावे जाहीर केली नाही तर न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयीतासह अन्य तिघे पसार आहेत. संशयीत अनिल याने मजूर शोधण्यासाठी आलेल्या लोकांची फसवणूक करायची आहे, असे सांगून वाहन बोलावले व हाडाखेड नाक्यावर अनिलने आणखी दोघांना वाहनात बसवून बोराडी गावात आणत एटीएम लूटीचा प्रयत्न केल्याची कबुली अटकेतील संशयीताने आपल्या कबुली जवाबात दिली आहे.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, हवालदार कैलास जाधव, हवालदार संतोष पाटील, हवालदार राजू ढिसले, हवालदार संदीप ठाकरे, हवालदार संदीप ठाकरे, हवालदार अनिल चौधरी, कॉन्स्टेबल संजय भोई, कॉन्स्टेबल योगेश मोरे, कॉन्स्टेबल मनोज नेरकर, कॉन्स्टेबल भूषण पाटील, कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर, चालक कॉन्स्टेबल स्वप्नील कासार आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.