भडगाव पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीच्या आठ दुचाकी जप्त


भडगाव : भडगाव तालुक्यातील गिरड गावातील दुचाकी चोरट्याला भडगाव पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडून चोरी केलेल्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या. अमोल शांताराम पाटील (रा.गिरड ता.भडगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गुजरात, मध्यप्रदेश तसेच पाचोरा परिसरातून या दुचाकी चोरल्याची आरोपीने कबुली दिली आहे.
झाले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
13 जानेवारी रोजी रात्री पंडीत झिपरु बोरसे (47, रा. गिरड) यांच्या मालकीची दुचाकी (क्रमांक एमएच 19 डीक्यू 5915) ही घरासमोरुन चोरट्याने चोरुन नेली होती. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल किरण पाटील हे करीत होते. दरम्यान ही दुचाकी अमोल पाटील (रा.गिरड) याने चोरी केल्याची माहिती भडगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरीष्ठांच्या मार्गदर्शनात पथकाने तपासाला गती देत अमोल याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली.

पोलीस कोठडीत दिली आठ दुचाकी चोरीची कबुली
गुरुवार, 18 रोजी अटक करुन न्यायालयातून चार दिवसांची कोठडी घेतली. या दरम्यान त्याची विचारपूस केली असता त्याने इतर दुचाकींची चोरी केल्याची कबुली देत दुचाकी काढून दिल्या.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हेड कॉन्स्टेबल किरण पाटील, हवालदार हिरालाल पाटील, हवालदार निलेश ब्राम्हणकर, पोलीस नाईक मनोहर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपुत, पोलीस कॉन्सटेबल प्रवीण परदेशी आदींच्या पथकाने केली.

दोन लाख 85 हजारांच्या दुचाकी जप्त
भडगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दुचाकी क्र. एमएच 19 डीक्यू 5915, अंकलेश्वर पोलीस ठाण्यात दाखल तीस हजार किमतीची होन्डा शाईन, 25 हजार किमतीची होन्डा सीडी, पाचोरा पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 50 हजार किमतीच्या तीन पल्सर, 25 हजार रुपये किमतीची स्पेल्डर प्लस, कुकशी पोलीस ठाणे (म.प्र.) 20 हजार किमतीची दुचाकी असा एकुण 2 लाख 85 हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.


कॉपी करू नका.