मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्राण्यांचा बळी : राष्ट्रीय जैन सेना संतप्त

पारसनाथ पर्वत परिसर हिंसाचार प्रतिबंधीत घोषित करण्याची मागणी


भुसावळ : जैन बांधवांचे पवित्र तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी, मधुबन, झारखंड येथे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या उपस्थितीत 19 जुलै रोजी चार प्राण्यांचा बळी देण्यात आल्याने देशभरातील जैन समाज संतप्त झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय जैन सेना, राष्ट्रीय प्रमुख ललित गांधी व उपप्रमुख संदीप भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय जैन सेना आणि सकल जैन समाजाने भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देत संपूर्ण पारसनाथ पर्वत परिसर आणि मधुबन शहर, प्राणी हिंसाचार प्रतिबंधित शहर म्हणून घोषित करून मुख्यमंत्र्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.

घृ्रणास्पद घटनेचा निषेध
सम्मेद शिखरजी हे जैन धर्माचे सर्वोच्च तीर्थक्षेत्र मानले जाते. जैन समाज अहिंसेच्या तत्त्वावर चालतो मात्र जैनांच्या या परम पवित्र तीर्थक्षेत्रावर पशू हत्या करणे हे असंवैधानिक आणि घृणास्पद कृत्य आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घडलेला प्रकार अत्यंत निषेधार्थ असल्याचे निवेदनात नमूद आहे.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना राष्ट्रीय जैन सेना शाखेचे अध्यक्ष चेतन हेमावत जैन, उपाध्यक्ष गजेंद्र रुईकर, सचिव सतीश गोसावी, सदस्य योगेश वास्कर, ज्येष्ठ मार्गदर्शक अजय जैन, दिगंबर जैन मंदिराचे सचिव दीपक काठे, रोखापाल रमेश अन्नदाते, तसेच जैन समाजातील मान्यवर उपस्थित होते.


कॉपी करू नका.