यावलच्या श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या संचालक पदी डॉ.उमेश कवडीवाले


यावल : यावल शहरातील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या कार्यकारीणीची विशेष सभा मंगळवार, 23 जुलै 2024 रोजी बँकेच्या सभागृहात झाली. यावेळी बँकेचे संचालक कै.डॉ.सतीश यावलकर व कै.किरण अट्रावलकर यांच्या निधनानंतर नैमिक्तीक रिक्त झालेल्या संचालक पदाच्या जागेवर डॉ.उमेश श्रीहरी कवडीवाले व तेजस सतीश यावलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमंत चौधरी, उपाध्यक्ष शरद यावलकर, संचालक सुरेश वाणी, जगदीश कवडीवाले, दिलीप नेवे, महेश वाणी, यशवंत सोनवणे, नितीन हडपे व सुनीता गडे हजर होते. अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक एस.एफ. गायकवाड उपस्थित होते. अध्यक्ष हेमंत चौधरी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले


कॉपी करू नका.